नेवासा- अमोल मांडण
नेवासा- तालुक्यातील मक्तापूर गावच्या उपसरपंच पदी गोरक्षनाथ बर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावच्या उपसरपंचपदी गोरक्षनाथ बन्सी बर्डे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांचा मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच अमृता अंकुश गोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन गोरक्षनाथ बन्सी बर्डे यांना उपसरपंच पद दिले. यावेळी मक्तापूर गावच्या सरपंच सुशीला लहारे, नेवासा बाजार समितीचे संचालक भरत काळे, मक्तापूर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, पोलीस पाटील अनिल लहारे, मराठा सुकाणु समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश झगरे, अंकुश गोरे, राहुल साळवे, निवृत्ती लहारे, कल्याण लहारे, अण्णा खैरे, भाऊसाहेब कांगुणे, आजिनाथ जामदार, अशोक साळवे, सुनील साळवे, तन्मय पांडागळे, ग्रामसेवक दत्तात्रेय गर्जे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या
निवडणुकीचे काम ग्रामसेवक दत्तात्रय गर्जे यांनी पाहिले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा