गंगापूर प्रतिनिधी–
गंगापूर-दाजी व सख्ख्या भावानेच बलात्कार करुन अल्पवयीन मुलीला गरोदर केले.
बहिण भाऊ व दाजी मेहुणीच्या नात्याला काळीमा फासणाऱा गुन्हा गंगापूर तालुक्यातील बोरगाव येथील सख्याभावाने व मावस दाजीने वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देत अनेक वेळा बळजबरी शरीरसंबंध ठेवुन गरोदर राहिल्याने दाजी व भावा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करून न्यायालय समोर उभे केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२२ मध्ये मावस बहिणीचा नवरा संदीप रतन शिंदे रा.नांदगाव ता. नांदगाव जि.नाशिक याने गंगापूर तालुक्यातील बोरगाव येथे राहत्या घरी दिवाळी दरम्यान घरात कोणी नसताना माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत व जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला व वाहेगाव येथेही रात्रीच्या वेळेस अंघोळीच्या बाथरुम मध्ये बळजबरीने शारीरीक संबंध केले आहे. तर सख्खा भाऊ जगदीश भगवान तांबे याने देखील नववीच्या वर्गात शिकत असल्यापासुन ते डिसेंबर २०२२ च्या दरम्यान बोरगाव येथील राहते घरात वेळोवेळी अल्पवयीन बहिणीच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शारीरीक संबंध केल्याने अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून मावस दाजी संदिप रतन शिंदे रा. नांदगाव ता.नांदगाव जि.नाशिक व सख्खा भाऊ जगदीश भगवान तांबे रा. बोरगाय ता. गंगापुर जि. संभाजीनगर यांच्या विरुध्द पोस्को व बलात्कार करुन गर्भवती केल्या प्रकरणी शिल्लेगांव पोलीस स्टेशनमध्ये १८ मार्च रोजी कलम-३७६(२)(N).(F)(J),५०६,३४भादवी सहकलम
४.५(J) (२) (L) (N).६८.१२ पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करून गंगापूर न्यायालयात उभे केले असता तिन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डी.एस.साखळे हे करत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा