नेवासा प्रतिनिधी-सुधीर चव्हाण
नेवासा- आ. शंकरराव गडाख युवा मंचच्या वतीने आयोजित देखावे स्पर्धांचे सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते बक्षीस वितरण…
गावाला गावपण देण्यासाठी एक विचारांची सांगड घालून एकोपा वृद्धिंगत होणे गरजेचे-सौ.सुनीताताई गडाख…
नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख पाटील युवा मंच व आम्ही नेवासकर मीडिया पार्टनर यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा तालुक्यातील गणेश भक्तांसाठीसाठी आयोजित देखावे स्पर्धांच्या विजेत्यांना सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.गावाला गावपण देण्यासाठी एक विचारांची सांगड घालून एकोपा वृद्धिंगत होणे गरजेचे असून हा एकोपा उत्सवाच्या माध्यमातून शक्य असल्याचे मत सौ.सुनीताताई गडाख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
नेवासा येथील आमदार शंकरराव गडाख जनसंपर्क कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक रामभाऊ जगताप, मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील, लक्ष्मणराव जगताप, मुळा कारखान्याचे संचालक नारायण लोखंडे, शिवा जंगले, रविंद्र जोशी, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, फारुकभाई आतार, ॲड.काकासाहेब गायके, राजेंद्र चौधरी, प्रकाश सोनटक्के, पोपटराव जिरे, राजेंद्र मापारी, दिनेश व्यवहारे, सचिन नागपूरे, रणजित सोनवणे, मच्छिद्र कडू, निलेश जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ.सुनिताताई गडाख म्हणाल्या की
समाजात सुसंवाद निर्माण व्हावा म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला. आता कालानुरूप अनेक बदल होत असतांना विविध सण उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला आनंद घ्यायचा आहे.देखावे स्पर्धा हा त्याच्याच एक भाग आहे.एकविचाराने व एकोप्याने कसे रहायचे हे उत्सवातून आपल्याला शिकायचे आहे.एकोपा निर्माण करून विचारांची सांगड आपल्याला घालायची आहे.विचारांनी एकोपा वाढीस लागतो.अशीच नवी दिशा घेऊन आपल्याला नेवासा तालुक्याला एका उत्कर्षाच्या प्रवाहाकडे न्यायचा आहे.समाजाला वर काढण्यासाठी आपल्याला अशा स्पर्धांच्या माध्यमातून पर्याय शोधायचा आहे.समाजाच्या प्रबोधनासाठी विचारांची सांगड घालून पुढे जाण्याचा सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
या स्पर्धेसाठी आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीने सात हजार रुपये प्रथम, कै.सचिन कराळे यांच्या स्मरणार्थ आ. शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने पाच हजार रुपये, मुकिंदपुरचे सरपंच सतीशदादा निपुंगे यांच्या वतीने तीन हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.यावेळी झालेल्या स्पर्धेत ३१ जणांची निवड करण्यात आली तर यामध्ये पंधरा जणांना मुख्य तीन पारितोषिकांसह प्रशस्तीपत्र देण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अभयकुमार गुगळे, विनायक नळकांडे, जालिंदर गवळी, राहुल देहाडराय, जयदीप जामदार, राजेंद्र घोरपडे, विक्की खराडकर, दिलीप जाधव, नरसु लष्करे, ॲड.प्रदीप वाखुरे, ॲड.मयूर वाखुरे, अभिषेक गाडेकर, तुकाराम पवार,भैया कावरे, राजेंद्र सुकाळकर, राजेंद्र लोखंडे, तुषार परभणे, अस्लम मणियार, भाऊसाहेब वाघ, राम घोलप, अन्सार बागवान, प्रविण सरोदे यांच्यासह कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.देविदास साळुंके यांनी केले तर आम्ही नेवासकर मिडिया ग्रुपचे सौरभ मुनोत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा