ब्रेकिंग

नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील श्रीराम गणेश मंडळाच्या गणपतीची आरती माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आली…

नेवासा- अमोल मांडण

नेवासा- तालुक्यातील मक्तापूर येथील श्रीराम गणेश मंडळाच्या गणपतीची आरती माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आली…

नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. जय श्रीराम मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने भाऊसाहेब वाकचौरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थिती शिवसेनेचे नेते व मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांच्या विनंतीला मान देऊन वाकचौरे यांनी आरतीला ऊपस्थिती राहिले. गणेश म्हणाले की माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी पाच वर्षे खासदार असताना मक्तापूर गावाला पंतप्रधान घरकुल मंजूर केले. हायमॅक्स लाईटसाठ निधी दिला. वाकचौरे खासदार असताना मक्तपुर गावाला 25 लाखाचा निधी त्यांनी दिला. यावेळी वाकचौरे ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी ब्रह्मकुमारी वंदना दीदी, शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप, मराठा सुकाणु समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व शिवसेना नेते गणेश झगरे, मक्तापूरचे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, हरिभाऊ कोळेकर, दिलीप महाराज बर्डे, पोलीस पाटील अनिल लहारे, माजी सरपंच रामकृष्ण कांगुणे, अनिल कांगुणे, शुभम लहारे, योगेश कोळेकर, योगेश कांगुणे, विशाल बर्डे, दीपक शिंदे, बबलू नवघरे, योगेश गायकवाड, रामचंद्र बर्डे, समर्थ बर्डे, नेवासा मार्केट कमिटी संचालक भरत काळे, मनोज झगरे, दीपक बर्डे, अमोल सातपुते, किरण सातपुते, सचिन गायकवाड, सागर कोळेकर, अक्षय भागवत, ज्ञानेश्वर बर्डे आदी मक्तापूर ग्रामस्थ व गणेश भक्त उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे