नेवासा येथे संत तुकाराम महाराज मंदिरात गाथा पारायणास सुरवात झाली.
नेवासा- अमोल मांडण
नेवासा- तीर्थक्षेत्र नेवासा येथे असलेल्या जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये तुकाराम बीज”उत्सवाच्या निमित्ताने गाथा पारायण सोहळयास गुरुवर्य हभप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. पाचवा वेद असलेल्या संत तुकोबांच्या गाथा ग्रंथांचे पारायण करणे म्हणजे तुकोबारायांची गळाभेट घेण्यासारखे असल्याने जीवनात गाथा ग्रंथाचे पारायण करा असे आवाहन हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी झालेल्या गाथा पारायण शुभारंभ प्रसंगी संत तुकाराम महाराज मंदिराचे सेवेकरी हभप अंकुश महाराज जगताप यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत केले.
हभप उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे व गाथा ग्रंथांचे पूजन करण्यात येऊन पारायणाचा शुभारंभ करण्यात आला.
पारायण व्यासपीठ म्हणून हभप नामदेव महाराज जाधव(शास्त्री)लक्ष्मण महाराज नांगरे हे करत असून दि.१३ मार्च ते २० मार्च या कालावधीत होत असलेल्या गाथा पारायणसोहळयासाठी सर्वांच्या सोईच्या दृष्टीने कीर्तनाची वेळ ७ ते ९ अशी ठेवण्यात आली असून सकाळी ७ ते ११ गाथा पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, दुपारच्या सत्रात ३ ते ५ यावेळेत भजनांचे कार्यक्रम होत असून भाविकांनी गाथा पारायण सोहळयात होणाऱ्या पारायणाचा व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप उद्धव महाराज यांनी केले आहे.