नेवासा प्रतिनिधी-सुधीर चव्हाण
नेवासा- पंढरपूर येथील देवगड संस्थानच्या मठात होणाऱ्या पंचदिनात्मक कार्यक्रमासाठी एस.टी. बसेस रवाना...
पंढरपूर येथील देवगड संस्थानच्या मठात श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा पालखी सोहळयाच्या निमित्ताने दि.२६ जून ते ३० जून या कालावधीत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या पंचदिनात्मक कार्यक्रमासाठी नेवासा येथून भाविकांची एस.टी. बसेस पंढरपूर साठी रवाना झाल्या.
यावेळी नेवासा आगार प्रमुख रामनाथ मगर यांच्या हस्ते नेवासा पंढरपूर एस.टी.ला पुष्पहार घालून व श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले.यावेळी वारकरी बांधव व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव ताके पाटील व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सचिव पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या हस्ते एस.टी. चे चालक आदिनाथ आव्हाड व वाहक रमेश विटकर यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलतांना आगार व्यवस्थापक रामनाथ मगर म्हणाले की आषाढी वारी पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने विठूरायाच्या दर्शनासाठी जादा बस गाडयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच देवगड दत्त मंदिर देवस्थानच्या वतीने पंढरपूर येथील देवगड मठात होणाऱ्या पंचदिनात्मक कार्यक्रमासाठी देखील जादा बस गाड्या सोडण्यात येतील वारकऱ्यांच्या सेवेचे भाग्य आम्हाला लाभत आल्याने नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर यात्रेसाठी तत्पर गाड्यांची सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी बोलतांना दिली.
नेवासा प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव ताके म्हणाले की
पंढरपूरसाठी जादा बस गाड्या सोडण्यात याव्या म्हणून आम्ही याआधीच मागणी केली होती त्या मागणीनुसार पंढरपूरसाठी जादा बस गाड्या सोडण्यात येत आहे. त्या तत्पर सोडण्यात याव्यात व चांगली सेवा वारकऱ्यांना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी देवगडचे संतसेवक सोमनाथ वाखुरे, श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा स्वच्छता उमाकांत कंक, सौ.जयाताई कंक, नाना सुरोशे, विठ्ठल बोडखे, एकनाथ डोहोळे, टीव्ही मीडियाचे प्रतिनिधी शंकरराव नाबदे यांच्यासह स्त्री पुरुष वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा