नेवासा सचिन कुरुंद
प्रवरासंगम प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष
नेवासा – संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू होत आहे.प्रत्येक शाळेत नव्यानेच दाखल झालेल्या पहिलीच्या चिमुकल्यांचे स्वागत समारंभाचे आयोजन होत असते.आज प्रवरासंगम शाळेत पहिलीच्या चिमुकल्यांचे ढोल लेझीमच्या गजरात गाडीतून मिरवणूक काढण्यात आली .गाडी फुग्यांनी सजवण्यात आली होती. नंतर फुलांची उधळण करून औक्षण करण्यात आले.पहिलीतील सर्व चिमुकल्यांचे सेल्फी पाॅईट ला फोटो काढण्यात आले.विविध शैक्षणिक स्टाॅल लावून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अतिशय आनंददायी वातावरणात प्रवरासंगम चा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. प्रतिनिधिक स्वरूपात पहिलीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठ्यपुस्तकाचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नवागताचे स्वागत साठी प्रवरासंगम च्या सरपंच सौ.अर्चनाताई सुडके मॅडम व केंद्रप्रमुख संतोष ढोले सर, प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र चापे सर ,जयश्री कोल्हे मॅडम,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व बहुसंख्येने उपस्थित मातापालक होत्या. नव्यानेच शाळेत हजर झालेले शिक्षक सुनिल वाघ सर यांचा सत्कार करण्यात आला. आज शालेय विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गोड जेवण देण्यात आले.प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दयानंद गाडेकर सर ,अमोल गागंर्डे सर ,नलिनी काकडे मॅडम,सुनिता कर्जुले मॅडम,नूतन जोशी मॅडम,कल्पना धनावत मॅडम भांबिरे मॅडम यांचे विशेष सहकार्य मिळाले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा