नेवासा प्रतिनीधी सचिन कुटे
नेवाशात घुमला जयहरी विठ्ठलचा नारा…आमदार विठ्ठलराव लंघे ची लागली लॉटरी
नेवासा : नेवासा विधानसभा निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख यांचा पराभव करत चार हजार पाचशे बतीस मतांनी विठ्ठलराव लंघे आमदार झालेले आहेत.
नेवासा विधानसभा निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे , माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यात लढत झाली.
या लढतीत मुरकुटे व गडाख यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. उमेदवारी उशिराने जाहीर होऊनही लंघे यांनी प्रचारात मुसंडी मारली. गडाख व मुरकुटे यांना मागे टाकत पहिला क्रमांक घेतला.
लंघे यांनी मतदारांच्या गाठीभेठी घेत मतदारांना विकासाचे आश्वासन देत त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. ही आपली शेवटची निवडणूक असल्याचा भावनिक मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
लंघे यांच्या भावनिक आवाहनाला तालुक्यातील मतदारांनी साथ दिली. लंघे यांना तालुक्यातील सर्वच गावातील मंडळींंची साथ महत्वपूर्ण ठरली.लाडकी बहिण योजना हिंदुत्वाचा मुद्दा व भावनिक साथ मिळाल्याने विजय मिळवला
निवडणूक निर्णय अधिकार्यांनी लंघे यांना विजयी करताच जयहरी विठ्ठलाचा नाराघुमला. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते गोळा झाले होते ठीक ठिकाणी पेढे वाटून आनंद व्यक्त करताना दिसले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा