गंगापूर प्रतिनिधी–
गंगापूर- गंगापूर कारखाना निवडणुकीत कृष्णा पाटील डोणगावकर यांचा पॅनल आघाडीवरवर..
एकूण १४ हजार ६६ मतदार सभासदांपैकी ७ हजार ५९८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर तिन हजार मतदार कालवश झाले आहे.
गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी पुर्ण झाली असून यामध्ये भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या शेतकरी सभासद कामगार पॅनलला दणका बसला आहे. ५७१ मतांनी बंब यांचे पॅनल पिछाडीवर आहे, तर ठाकरे गटाचे कृष्णापाटील डोणगांवकर यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनल आघाडीवर आहे.
दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असून त्यानंतरच कारखाना कोणाच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट होईल. सध्या बंब-डोणगांवकर यांच्या पॅनलमध्ये जोरदार लढत सूरू आहे. लासूर स्टेशन गटातून कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी आमदार प्रशांत बंब यांच्यावर एका मताने आघाडी घेतली आहे. २० जणांच्या संचालक मंडळासाठी रविवारी ( १२ फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली होती.
आज प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिल्या फेरीची मतमोजणी पुर्ण झाली आहे. या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला होता. एकूण १४ हजार ६६ मतदार सभासदांपैकी ७ हजार ५९८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ५४ टक्के इतके मतदान झाल्यामुळे निवडणूकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा