ब्रेकिंग

शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत व्हावे यासाठी नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर भव्य मोर्चा

नेवासा- अमोल मांडण

नेवासा- शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत व्हावे यासाठी नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवासा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती खूपच खालावलेली असताना कुठल्याच शेतमालाला रास्त भाव मिळत नसून शेतकऱ्यांची पिके शेतामध्येच उभे आहेत. सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.पाण्याविना शेतकऱ्यांची पिके हाता तोंडाशी आलेली असताना व धरण 100% भरूनही शेतीसाठी पाणी सोडले जात नाही. त्यात माहविकास आघाडी सरकारकडून प्रत्येक दोन महिन्याला शेतकऱ्यांकडून सक्तीने पाच हजार रुपये वसूल करत आहे सद्यस्थितीला सरकार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना 67 टक्के अनुदान देते म्हणजेच 16 तासाचे पैसे सरकार भरते आणि वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना फक्त 8 तासच वीज देते. शेतकऱ्यांचे वीज बिल जर सरकार भरत असेल तर वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांकडून कुठली वसुली पठाणी वसुली करते. असे प्रतिपादन नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. नेवासा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मोर्चाच्यामध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ठणकावून सांगितले की,जोपर्यंत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीच्या कुठल्या अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला गावामध्ये फिरकू देणार नाही.संपूर्ण तालुक्यातील वीज सबस्टेशन कुलूप ठोकून बंद करण्याचा इशारा दिला.
माजी खासदार तुकाराम गडाख यांनी अजित पवार यांनी मागे केलेल्या एका भाषणामध्ये म्हणाले होते की जर शेतकऱ्यांची वीज कोणी कापली तर मी पवारांची अवलाद नाही. म्हणून तुकाराम गडाख यांनी जाहीर सभेत विचारले अजित पवार साहेब आज तुम्ही तरी सांगा कोणाचे आहात असा खोचक टोला मा. खासदार तुकाराम गडाख यांनी अजित पवार यांना लावला.त्याच बरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की, हे महाविकस वसुली सरकार शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज खंडित करून शेतकऱ्यांना पूर्णपणे उध्वस्त करत आहे हे सरकार म्हणजे कुठलीही नीतिमूल्ये नसणारे सरकार आहे यांना पूर्णपणे माहित आहे की परत आपल्याला कुणीही विचारणार नाही म्हणून यांनी फक्त वसुली चालवलेली आहे. तसेच धरण पूर्ण भरलेले असताना पाणी वेळेवर मिळतच नाही. म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती नेवासा तालुक्यातील जनतेची झालेले आहे.
वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता काकडे साहेब, बडे साहेब व चकोर साहेब यांनी निवेदन स्वीकारले.याप्रसंगी भारतीय जनता पार्टी नेवासा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी तसेच अंकुशराव काळे, राजू काका मते, प्रताप चिंधे, गोरक्षनाथ कानडे, बापूसाहेब देशमुख, रावसाहेब राक्षे, माऊली पेचे, हरिभाऊ तागड व मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दादा देशमुख आदींची भाषणे यावेळी झाली.
या मोर्चाला शहराध्यक्ष मनोज पारखे, बाळासाहेब क्षीरसागर, युवा नेते निरंजन डहाळे, रितेश कराळे, विश्वासराव काळे, नगरसेवक सुनील वाघ, नगरसेवक सचिन नागपुरे, नगरसेवक राजेंद्र मापारी, येडू सोनवणे, शरद जाधव, अशोक टेकणे, राजेंद्र कडू, प्रतीक शेजुळ,रविकांत शेळके, कैलास दहातोंडे, किरण जावळे, अनिल जरे, स्वप्नील जरे, तुळशीराम काळे, भाऊराव नगरे, सतीश गायके, तुळशीराम झगरे, कल्याणराव मते, बाबासाहेब नवथर, जनाभाऊ जाधव, रितेश भंडारी, सुनील हारदे, राजू वाखुरे,माऊली सोनवणे, रमेश घोरपडे, रमेश रोडे, दत्तात्रय वरुडे, अण्णा गव्हाणे, देवेंद्र काळे, अरुण गरड, विष्णू गायकवाड, निवृत्ती जावळे,
प्रसिद्धीप्रमुखआदिनाथ पटारे अजित नरूला, बाळासाहेब मोटे,नानासाहेब शेंडे,पप्पू शेख, सलमान शेख आदि भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे