ब्रेकिंग

ख्रिस्त राजा चर्च, घोडेगाव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी…

घोडेगाव प्रतिनिधी: बारगळ सर

ख्रिस्त राजा चर्च, घोडेगाव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी…

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील “ख्रिस्त राजाची” यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या यात्रेची सुरुवात २० नोव्हेंबर पासून झाली होती. आध्यात्मिक तयारीसाठी तीन दिवस (त्रिदिन) ख्रिस्त राजाची नोव्हेना भक्ती आयोजित केली होती. बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी नोव्हेना भक्तीचे पहिले पुष्प कॅथोलिक धर्मप्रांताचे सेवानिवृत्त बिशप रा. रेव्ह. डॉ. लुर्ड्स डॅनियल यांच्या शुभहस्ते “ख्रिस्त राजाच्या झेंड्याचे” ध्वजारोहण करण्यात आले.

त्यानंतर नोव्हेना भक्ती व पवित्र संगीत मिस्साबलिदान झाला. विषय: “आशावादी यात्रेकरू ख्रिस्तसभा” होता. गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी नोव्हेना भक्तीचे दुसरे पुष्प घोडेगाव धर्मग्रामाचे सुपुत्र रेव्ह. फा. फ्रान्सिस पटेकर, येशू संघीय, प्रिन्सिपल ज्ञानमाता विद्यालय व ज्युनियर कॉलेज, संगमनेर नोव्हेना भक्ती व पवित्र संगीत मिस्साबलिदान यांचे होते. विषय: “पवित्र मरिया नित्य सह्यकारी माता” हा होता.

शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर रोजी नोव्हेना भक्तीचे तिसरे पुष्प औरंगाबाद डायसेसचे रेव्ह. फा. संजय ब्राम्हणे, प्रमुख धर्मगुरू व प्रिन्सिपल, वैजापूर नोव्हेना भक्ती, आरोग्य दानाची प्रार्थना सभा व पवित्र संगीत मिस्साबलिदान त्यांचे होते. विषय: “आरोग्य दाता प्रभू येशू” हा होता.

शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी यात्रेच्या दिवसी सायंकाळी ठिक ५:०० वाजता ख्रिस्त राजाच्या प्रतिमेची व पवित्र साक्रामेंताची भव्य मिरवणूक सेंट ॲनिज हॉस्पिटल घोडेगाव पासून ते ख्रिस्त राजा चर्च पर्यंत.” होती. सायंकाळी ठिक ६:०० वाजता पवित्र संगीत मिस्साबलिदान होता.

नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप रा. रेव्ह. डॉ. बार्थोल बरेटो हे यात्रेचे प्रमुख याजक व प्रवचनकार होते.” त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले,
येशू हा इतर राजांसारखा नाही: तो सत्ता आणि श्रीमंतीच्या शोधात नाही, तर येशू हा सेवक-राजा आहे, जो नम्रता, सत्य आणि प्रेमाने राज्य करतो. आज आपण येशूला आपला सेवक-राजा मानूया आणि त्याच्या नम्र सेवकाच्या उदाहरणाचे अनुकरण व पालन करण्याचा प्रयत्न करूया. गायन मंडळाने आपल्या मधुर गायनाने वातावरण अगदी प्रसन्न केले होते. पवित्र संगीत मिस्साबलिदाना नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

रविवार दि. २४ नोव्हेंबर सकाळी ९:३० वाजता पवित्र संगीत मिस्साबलिदान नेवासा धर्मग्रामाचे सहाय्यक धर्मगुरू रेव्ह. फा. अक्षय आढाव हे पवित्र संगीत मिस्साबलिदानाचे प्रमुख याजक व प्रवचनकार होते. पवित्र संगीत मिस्साबलिदानांतर “ख्रिस्त राजा यात्रेची” सांगता फा. अक्षय आढाव यांच्या हस्ते ख्रिस्त राजाचा झेंडा उतरवून झाली. हि संपूर्ण यात्रा आध्यात्मिक रीत्या मोठ्या आनंदात पार पडली.

या यात्रेसाठी भाविक विविध खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. हि यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा. अब्राहाम रणनवरे, रेव्ह. फा. झेवियर, सेंट ॲनिज व सेंट जोसेफ धर्मभगीनी, यात्रा कमिटी, धर्मग्राम पाळकीय समिती, महिला मंडळ, युथ ग्रुप, ज्येष्ठ नागरिक मंडळ व सर्व खेड्यापाड्यातील धर्मग्रामस्थ ख्रिस्त राजा चर्च, घोडेगाव यांनी खूप परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे