ब्रेकिंग
बाळासाहेब थोरात यांच्या 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग…
संगमनेर प्रतिनीधी
बाळासाहेब थोरात यांच्या 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग…
संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदार संघावर सुमारे ४० वर्षे बाळासाहेब थोरात यांची सत्ता होती. या सत्तेला माजी खासदार डाॅ. सुजय विखे यांच्यामुळे सुरुंग लागला. विखेंमुळेच अमोल खताळ यांचा विजय निश्चित झाला.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात व महायुतीकडून अमोल खताळ निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले होते. या मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच सुजय विखे यांनी संपर्क अभियान राबविले होते.
संगमनेरमध्ये विखे यांनी संपर्क अभियानाबरोबरच बैठका व सभा घेऊन राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. संगमनेरमध्ये थोरात यांचा पराभव करण्याचा केलेला निश्चय विखे यांनी थोरात यांचा पराभव केला.
थोरात यांचा पराभव करून थोरात यांची विखे यांनी अनेक वर्षाची दहशत संपविली आहे, अशीच प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. थोरात यांचा पराभव झाल्यानंतर संगमनेरमध्ये ठीक ठिकाणी पाहवयास मिळाला.