- घोडेगाव प्रतिनिधी: बारगळ सर
घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्चच्या यात्रेस २० नोव्हेंबर पासून सुरुवात…
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील “ख्रिस्त राजा चर्च यात्रेची” सुरुवात २० नोव्हेंबर पासून होणार आहे. यात्रा ही शनिवार दि. २३ नोव्हेंबर ला असली, तरी यात्रापूर्व आध्यात्मिक तयारीसाठी तीन दिवस (त्रिदिन) ख्रिस्त राजाची नोव्हेना भक्ती आयोजित केली आहे.
बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी नोव्हेना भक्तीचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी कॅथोलिक धर्मप्रांताचे सेवानिवृत्त बिशप रा. रेव्ह.डॉ. लुर्ड्स डॅनियल यांच्या शुभहस्ते “ख्रिस्त राजाच्या झेंड्याचे” ध्वजारोहण होईल. त्यानंतर नोव्हेना भक्ती व पवित्र संगीत मिस्साबलिदान होईल. विषय: “आशावादी यात्रेकरू ख्रिस्तसभा” असेल.
गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी नोव्हेना भक्तीचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी घोडेगाव धर्मग्रामाचे सुपुत्र रेव्ह. फा. फ्रान्सिस पटेकर येशू संघीय, प्रिन्सिपल ज्ञानमाता विद्यालय, संगमनेर नोव्हेना भक्ती व पवित्र संगीत मिस्साबलिदान होईल. विषय: “पवित्र मरिया नित्य सह्यकारी माता” असेल.
शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर रोजी नोव्हेना भक्तीचे तिसरे पुष्प गुंफण्यासाठी औरंगाबाद डायसेसचे रेव्ह. फा. संजय ब्राम्हणे, प्रमुख धर्मगुरू व प्रिन्सिपल, वैजापूर नोव्हेना भक्ती, आरोग्य दानाची प्रार्थना सभा व पवित्र संगीत मिस्साबलिदान होईल. विषय: “आरोग्य दाता प्रभू येशू” असेल.
शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी यात्रेचा दिवस सायंकाळी ठिक ४:३० वाजता ख्रिस्त राजाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक संत पेत्र चर्च, घोडेगाव पासून सुरू होईल तर ख्रिस्त राजा चर्च पर्यंत.” सायंकाळी ठिक ६:०० वाजता पवित्र संगीत मिस्साबलिदान असेल. नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप रा. रेव्ह. डॉ. बार्थोल बरेटो हे यात्रेचे प्रमुख याजक व प्रवचनकार असतील.” पवित्र संगीत मिस्साबलिदाना नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होईल.
रविवार दि. २४ नोव्हेंबर सकाळी ९:३० वाजता पवित्र संगीत मिस्साबलिदान होईल नेवासा धर्मग्रामाचे सहाय्यक धर्मगुरू रेव्ह. फा. अक्षय आढाव हे पवित्र संगीत मिस्साबलिदानाचे प्रमुख याजक व प्रवचनकार असतील. पवित्र संगीत मिस्साबलिदानांतर “ख्रिस्त राजा यात्रेची” सांगता होईल. त्रिदिन नोव्हेना भक्तीसाठी आलेल्या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. ज्या ज्या भाविकांना या यात्रेसाठी आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात सढळ हाताने मदत करावयाची आहे अशांनी रेव्ह. फा. फादर अब्राहाम रणनवरे 9049543788 किंवा 9921664449 या नंबरवर संपर्क साधावा.
या यात्रेसाठी व नोव्हेना भक्तीसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने यावे व या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा. अब्राहाम रणनवरे व रेव्ह. फा. झेवियर व सर्व धर्मग्रामस्थ यांनी केले आहे…
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा