नेवासा प्रतिनीधी
नेवाशात मुरकुटे-गडाख यांच्यात लढत…प्रचारात मुरकुटे यांची आघाडी कायम
नेवासा ः नेवासा विधानसभा मतादारसंघ निवडणुकीत प्रहार जनशक्तीचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे व महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्यात सरळसरळ लढत होत आहे.
प्रचार सुरु झाल्यापासून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी घेतलेली प्रचारातील आघाडी कायम असून त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.नेवासा विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे व विद्यमान आमदार शंकरराव गडाख व अपक्ष उमेदवार यांच्यात चांगली लढत होत आहे.
ही लढत तिरंगी होईल, अशीच शक्यता सर्वजण व्यक्त करीत होते. मात्र ही लढत प्रचाराच्या शेवटच्या टप्यात दुरंगी होत असल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा प्रचार वेगाने सुरु आहे. गावा-गावात त्यांचे जल्लोषात स्वागत होत असून जेसीबीतून फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत केले जात आहे. या स्वागतामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावलेले असून प्रचार अधिक जोमाने कार्यकर्ते करू लागलेले आहेत. त्यामुळे प्रचार सुरु केल्यापासून ते प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मुरकुटे यांनी घेतलेली आघाडी कायम टिकून आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा