अडबंगनाथ संस्थान भामाठाण चे मठाधिपती अरुण गिरीजी महाराज यांना श्री जगद् गुरू पदवी बहाल..
प्रतिनिधी :-श्रीरामपूर सोमनाथ मढीकर
अडबंगनाथ संस्थान भामाठाण श्रीरामपूर चे मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांना श्री श्री परम पूज्य जगद्गुरु ही पदवी बहाल करताना,खाटू श्याम श्री महाकाल आखाडा उज्जैन मध्य प्रदेशचे साधुसंत आणि विशेष मान्यवर, आखाडा प्रमुख धर्मगुरू आनंदगिरी महाराज सरस्वती, मदन जी महाराज राजस्थान, आखाड्याचे अध्यक्ष रावल बाबा उज्जैन, ललित बापू राजस्थान, रवि महाराज पिंपळगावकर, येवले महाराज यांनाही महामंडलेश्वर पद प्राप्त झाले, उपस्थित मान्यवर,अविनाश भामरे साहेब पुणे, नवनाथ आहेर सेठ, कैलास महाराज दुशिंग, संजय भवार दादा,गिरीश थोरात साहेब, कोळपकर सर, लखन गिरी महाराज,प्रेमनाथ महाराज, धर्मनाथ महाराज,सातकर मामा, आधी करून देशभरातील साधू संत आणि मान्यवर उपस्थित होते,
अरुण गिरीजी महाराज यांचा स्वभाव शांत व संयमी असून समाजातील तळागाळातील माणसाची त्यांची आत्मीयतेची नाळ जोडलेली आहे. चेहऱ्यावर एक दिव्य तेज व अद्वितीय व्यक्तिमत्व ही महाराजांची ओळख आहे.