गोंधवणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध…
श्रीरामपूर:- सोमनाथ मडीकर
श्रीरामपूर – तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या गोंधवणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची निवडणूक बिनविरोध पार पडली.जिल्हा बँकेचे संचालक मा. श्री.करण ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त श्री,.सचिन गुजर, व माजी आमदार श्री भानुदासजी मुरकुटे , ज्येष्ठ मार्गदर्शक श्री दिगंबर पाटील फरगडे यांच्या नेतृत्वाखाली गाव पातळीवर आपसात विचार विनिमय करून सोसायटीचे सर्व तेरा संचालक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनियुक्त संचालक म्हणून श्री. मनोहर फरगडे, श्री सचिन मोरगे,श्री विलास गोराणे,श्री बबन लबडे श्री मनसुख फरगडे, श्री सखाहरी कांदळकर, श्री विजय मोरगे, श्री बाप्पू लबडे, श्री राजेंद्र लबडे,श्री प्रवीण शेळके, दिपाली फरगडे, मंदाताई फरगडे, संगीता लबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोसायटीच्या 104 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशाप्रकारे निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.उपस्थित सर्वांचे श्री दिगंबर पाटील फरगडे, सरपंच श्री भारत तुपे,श्री दादासाहेब शिर्के,श्री.गोविंद कांदे पा.,श्री.संजय लबडे, श्री नंदकिशोर लबडे, श्री सूर्यकांत डावखर, श्री कैलास गुलदगड, श्री मयूर बोर्डे आदींनी अभिनंदन केले