नेवासा अमोल मांडणं
शनैश्वर देवस्थानचा शनिरत्न पुरस्कार गुरुवर्य बाबा ह.भ.प.महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांना जाहीर
शिंगणापुर :- शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्व.बाबुराव पा बानकर (भाऊ) यांच्या स्मृतिनिमित्ताने देण्यात येणारा या वर्षीचा शनिरत्न पुरस्कार गुरुवर्य बाबा ह.भ.प.महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकरनेवासा अमोल यांना जाहीर झाला आहे. काल दुपारी ३:०० वाजता शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विश्वस्त मंडळाने सद्गुरू नारायनगिरी महाराज आश्रमात येऊन गुरुवर्य बाबांची भेट घेऊन मा.खा.यशवंतराव गडाख साहेब, मा.आ.शंकरराव गडाख साहेब(माजी मंत्री, महाराष्ट्र) व शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळाने सर्वानुमते या पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आल्याची माहिती गुरुवर्य बाबांना दिली.यावेळी बोलतांना शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रा.शिवाजीराव दरंदले सर म्हणाले की स्व.बाबुराव पा बानकर भाऊंच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो. आध्यात्मिक क्षेत्रात २० वर्षाहुन अधिक काळ कार्य करत असतांना आपण सद्गुरू नारायनगिरी महाराज आश्रम व वरदविनायक सेवाधाम लोणी येथे आध्यात्मिक केंद्रांची उभारणी करून या माध्यमातून समाजमनांवर वारकरी संप्रदायातील संतांचे विचार रुजविण्याचे फ़ार मोठे कार्य करत आहात.आपल्या निवडीमुळे या पुरस्काराची उंची वाढल्याची भावना यावेळी सरांनी व्यक्त केली.यावेळी शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने गुरुवर्य बाबा ह.भ.प.महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांचा सन्मान करण्यात आला.*शनिवार,दिनांक-२० मे २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता शांतिब्रम्ह भास्करगिरीजी महाराज(श्री क्षेत्र देवगड संस्थान),मा.आ.शंकररावजी गडाख साहेब(मा. मंत्री, महाराष्ट्र) व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शनैश्वर देवस्थान शनिशिंगणापूर येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा