उच्च न्यायालयाच्या आदेशाने नगर जिल्ह्यातील तहसीलदारांवर गुन्हा दाखल..
नेवासा- अमोल मांडणं
नेवासा – नेवासा तालुक्याचे तहसीलदार यांनी दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांसमावेत 23 जून 2020 रोजी त्यांच्या कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार संजय नारळे,राहणार- माळी चिंचोरे,तालुका -नेवासा यांनी याबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती परंतु तेथे त्यांच्या तक्रारीला दाद न मिळाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली.त्यानुसार न्यायालयाने पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
याच न्यायालयाच्या आदेशानुसार नेवासा पोलिसांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याविरोधात शासकीय कार्यालयात स्वतःचा वाढदिवस साजरा करतांना मास्क न लावणे,पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमवणे या कारणामुळे भादवि कलम 188,269,270,51 (ब)प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.