श्रीरामपूर प्रतिनीधी
माजी आमदारांच्या वाहनावर गोळीबार… अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना…
श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या वाहनावार मंगळवार मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या बाबत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , १९ नोव्हेंबर रात्री साडेअकराच्या सुमारास डॉ. संजय फरगडे, जनार्धन गालपगारे असे आम्ही मातापूर येथे संजय लबडे यांच्या चारचाकी वाहनामध्ये बोलेरो चालक चेतन तनपुरे यांच्यासह मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेलो होतो.
तेथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटून आम्ही चौघे चारचाकी वाहनातून मध्यरात्री एकच्या श्रीरामपूकडे येत होतो. त्यावेळी दोन दुचाकीवरून तीनजण आमचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात आले. ही बाब सहकार्यांना सांगितली. काही अंतर गेल्यानंतर रस्त्यात अशोक सहकारी साखर कारखाना, अशोकनगरचे मुख्य गेट आले. सुरक्षित राहू या हेतून कारखान्याच्या गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु गेट अर्धवट बंद असल्याने वाहन आत जाऊ शकले नाही. त्यानंतर आम्ही त्यामुळे आम्ही श्रीरामपूरच्या दिशेने निघालो. त्याच वेळी आमच्या वाहनावार त्य तीनतरुणापैकी एकाने वाहनवर गोळीबार केला. परंतु ही गोळी हवेत निघून गेली.
त्यानंतर आम्ही श्रीरामपूरमध्ये प्रकाश चित्ते यांच्या घरी गेलो. त्यानंतर घडले्या प्रकाराबाबत श्रीरामपूर शहर पोलिस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घटनेने श्रीरामपूरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
हे तीन तरुण नेमके कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ही गोळी ही गोळी भरायची घटना नेमकी राजकीय द्वेशातून घडली की इतर कारणातून त्याचाही पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा