गंगापूर प्रतिनिधी–
गंगापूर- लग्नाचे अमिष दाखवुन बलात्कार करुन जाळुन टाकण्याची धमकी देणा-या तिन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गंगापूर आगाराच्या चालकाने सहकारी असलेल्या युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करुन अन्य दोघांच्या मदतीने जाळुन टाकण्याची धमकी दिल्या प्रकरणी चालकासह दोन जनावरं गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर येथील एस टी महामंडळ बस वरती चालक असलेले आरोपी संदिप अशोक गंडे (वय ३०) राहणार लासुरनाका. गंगापूर.याने फिर्यादी सहकारी युवतीवर
१९/०८/२०२२/ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजे पासुन ते दिनांक ०२/०१/२०२३/रोजी एक वाजेपर्यंत गंगापूर औरंगाबाद रोडवरील विराज हॉटेलच्या पाठीमागे शेतात व नेवासा फाटा येथिल साई लॉज येथे लग्नाचे अमिष दाखवुन वारंवार व वेळोवेळी शरीरिक बलात्कार केला व आरोपी अशोक मुरलीधर गंडे रा. लासुरनाक्या जवळ, गंगापुर ता. गंगापुर भास्कर सुर्यभान पवार रा. लामनगाव ता. कन्नड यांनी फिर्यादी यांना तुझ्या मोबाईल मध्ये जेवढे काढलेले फोटो पुरावे आहे ते डीलेट कर नाहीतर तुला आम्ही जिवंत जाळून टाकतो अशी धमकी दिली म्हणून २० जानेवारी रोजी भादवी कलम- ३७६ (२)(N) ५०६, ३४ प्रमाणे आरोपी संदीप गंडे, अशोक गंडे व भास्कर पवार यांच्या विरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना स्थळी प्रभारी स.पो.नि.शाईनाथ गिते, पो.उप.नि.अकील शेख आदींनी भेट दिली असुन यातील मुख्य आरोपी संदीप गंडे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पो.उप.नि.साखळे हे करत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा