नेवासा- अमोल मांडण
नेवासा- हाक मराठी अर्बन निधी लिमिटेड संचालकांचे कोल्हार खुर्द येथे कर्ज पुरवठा मार्गदर्शन शिबीर संपन्न .
हाक मराठी अर्बन निधी लिमिटेड या वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या वतीने काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सचिव आणि संस्थेचे संचालक चंद्रशेखर कडु पाटील यांनी कोल्हार खुर्द विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित कोल्हार खुर्द,येथे उपस्थितीत राहुन मराठा समाज व कुनबी मराठा यांच्या साठी बॅकेच्या वतीने देण्यात येणार्या. नविन योजना ज्यात नवीन उद्योग सुरू करणे किंवा आपला जुना व्यावसाय चालू आहे .पण त्यात वाढ करायची आहे.शेती पूरक व्यवसाय इत्यादी साठी हाक मराठा अर्बन निधी बॅक आपल्याला विना तारण कर्ज योजना 5 ते 10 लाखा पर्यंत कर्ज पुरवठा करणार आहे. 6.5 ते 8.5 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात येणार आहे . आशी माहिती दिली. यावेळी कोल्हार खुर्द सहकारी संस्था च्या वतीने वित्तीय संस्था चे संचालक चंद्रशेखर कडू पाटील यांचा सत्कार रामनाथ शिरसाठ यांनी केला तर फोरमचे प्रकाश भिगारदिवे यांचा सत्कार रखमाजी क्षीरसागर यांनी केला.
कोल्हार खुर्द येथील तरूणाना आपल्या संस्थाच्या वतीने आपण व्यवसाय साठी चंद्रशेखर कडु पाटील यांनी जास्तीत जास्त मदत करून कर्ज पुरवठा करावा असे संचालक अनिल पाटील आपल्या भाषणात बोलताना म्हणाले,रामनाथ शिरसाठ,विनोद मोरे,संजय भोसले यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कोल्हार खुर्द सहकारी संस्था चे संचालक अनिल पाटील, संचालक संजय भोसले, कोल्हार खुर्द ग्रामपंचायत माजी उपसरपंच भाऊसाहेब लोढे पाटील, रामनाथ शिरसाठ,सार्वमत चे पत्रकार विनोद मोरे,लोकमंतचे पत्रकार कडु पाटील,महिपती शिरसाठ, बाळासाहेब गाडे पाटील, गंगाराम लोढे पाटील, रंविद्र गाडे पाटील, विजय लोढे पाटील, बाळासाहेब जाधव पाटील, आल्फोन्स भोसले, आदि प्रमुख मान्यवर आणि नव उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा