नेवासा प्रतिनिधी-सुधीर चव्हाण
नेवासा- निवडून येणाऱ्या उमेदवाराची पद रद्द होण्याची भीती दूर होण्यासाठी वाढीव गावठाणचे प्रस्ताव त्वरित मंजूर करा …
माजी जि.प. सदस्य दिलीपराव सरोदे यांची मागणी….
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लक्षात घेता व निवडून येणाऱ्या उमेदवाराची पद रद्द होण्याची भीती दूर होण्यासाठी वाढीव गावठाणचे प्रस्ताव त्वरित मंजूर करा अशी मागणी व साकडे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन घातले आहे.
सदर निवेदनात दिलीपराव सरोदे यांनी म्हटले आहे की, आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील जागेत वाढीव गावठाण चे प्रस्ताव ग्रामपंचायत व कामगार तलाठी स्तरावरून प्रस्ताव तयार करून तहसीलदार यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी अहमदनगर यांच्या कडे पूर्वीच आपण पाठविलेले आहेत. त्यातील काही गावठाण विस्तार वाढीचे प्रस्ताव मंजूर करून भूमिहीन शेत मजूर वेठ बिगार यांना जागा प्लॉट वाटप केलेली आहे.
परंतु जिल्ह्यातील बऱ्याच गावातील प्रस्ताव अजूनही उप विभागीय स्तरावर आहेत. ते मंजूर करण्यात यावेत,कारण पुढे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका येणार आहेत, परंतु निवडणुकीत विजयी न झालेले उमेदवार सरकारी जागेत राहतो म्हणून जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली जाते. नाईलाजाने सादर केस मध्ये निवडून येऊन सुद्धा पद रद्द होण्याची भीती असते. भारतीय संविधानाने मतदारास निवडणुकीचा अधिकार असतांना सुद्धा केवळ गावठाणात राहतो म्हणून गावठाण विस्तार वाढीचा प्रस्ताव मंजूर नसल्याने
निवडून येणाऱ्या उमेदवारास धोका होऊ शकतो.
सरकारी जागेत राहतो पद रद्द होऊ नये म्हणून असे प्रस्ताव व केसेस भविष्यामध्ये होऊ नये त्याकरिता अहमदनगर जिल्ह्यातील गावठाण विस्तारवाढीचे प्रस्ताव प्रलंबित असलेले प्रस्ताव मंजूर करणेकामी व नवीन प्रस्ताव मागवून ते मंजूर करणे कामी आपल्या मार्फत कार्यवाही व्हावी अशी विनंती साकडे श्री सरोदे यांनी निवेदनाद्वारे घातले आहेत केली.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अहमदनगर, उपविभागीय अधिकारी अहमदनगर,तहसिलदार नेवासा यांना पाठविण्यात आल्या आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा