नेवासा प्रतिनिधी-सुधीर चव्हाण
नेवासा- देशाच्या उज्वल भवितव्यासाठी महिलांचा सन्मान होणे ही काळाची गरज-सौ.विजयाताई अंबाडे…
नेवासा तालुक्यातील खेडले काजळी येथे बँक अधिकारी श्रीमती सुनिता ढगे पाटील यांच्या सेवापूर्ती चा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ.विजयाताई अंबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.देशाच्या उज्वल भवितव्यासाठी महिलांचा सन्मान होणे ही काळाची गरज असून कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा सन्मान वाढवा असे आवाहन सौ.विजयाताई अंबाडे यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडली काजळीचे सरपंच बाळासाहेब येडु कोरडे हे होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.विजयाताई अंबाडे यांच्या हस्ते बँक अधिकारी श्रीमती सुनिताताई ढगे पाटील यांचा सत्काराद्वारे सन्मान करण्यात आला यावेळी बोलतांना सौ. अंबाडे ताई म्हणाल्या की ग्रामीण भागामध्ये विधायक संस्कृतीचे जतन करणारे व विशेषतः महिलांचा सन्मान करणारे कार्यक्रम करणे ही काळाची गरज आहे श्रीमती ढगे यांनी पतीच्या अकाली निधनानंतर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली त्यांना उच्च पदवीधारक केले त्याचबरोबर कुटुंबाची व सासू-सासर्यांची ही चांगली सेवा करून समाजात आदर्श निर्माण केला त्यामुळे त्या आज सत्कारास पात्र आहेत अशा स्त्री शक्तीचा सन्मान वाढवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
याप्रसंगी नानासाहेब अंबाडे यांनी सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक स्वर्गीय साहेबराव ढगे यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करत जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी युवक कार्यकर्ते साठे यांनी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.याप्रसंगी माजी उपसरपंच सुदाम कोरडे, शिवाजी ढगे,माजी सरपंच सौ.निर्मलाताई ढगे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब शिरसाठ, भाऊसाहेब चव्हाण,संदीप ढगे,परसराम कोरडे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले तर मोहनराव कोरडे यांनी आभार मानले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा