नेवासा प्रतिनिधी-सुधीर चव्हाण
नेवासा- तालुक्यातील उस्थळदुमाला येथील पायी पालखी दिंडीचे हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान
नेवासा तालुक्यातील उस्थळदुमाला येथील हनुमान भजनी मंडळाच्या आषाढी पायी वारी पालखी दिंडीचे “ज्ञानोबा तुकाराम”,जय हरी विठ्ठल ..विठ्ठल विठ्ठल…असा हरिनामाचा जयघोष करत शनिवारी दि.१७ जून रोजी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाली.दिंडीच्या प्रस्थान प्रसंगी गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत या दिंडीचे स्वागत करून पालखीतील पादुकांचे दर्शन घेतले.
उस्थळदुमाला येथील संदीप काळे यांच्या निवासस्थानी
झालेल्या या दिंडीच्या स्वागत प्रसंगी वाघ आणि काळे कुटुंबाच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना टाळ वाटप करण्यात आले.यानंतर दोन्ही कुटुंबाच्या वतीने पालखी दिंडीतील पादुकांचे पूजन करण्यात येऊन वारकऱ्यांना अल्पोपहाराचे तर सरपंच किशोर सुकाळकर यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना शबनम बॅग पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक आसाराम काळे, बाबासाहेब काळे, किशोर काळे, संदीप काळे, निखिल वाघ, किरण काळे, अमोल काळे,ज्ञयोगेश काळे, अबू कसावणे, शंकर चौधरी, पोलीस पाटील प्रसाद गायकवाड, देविदास गायकवाड, बाबुराव गुरुजी उपस्थित होते.
यावेळी दिंडीतील आठरे गुरुजी, दादा वाघ, साहेबराव कसावणे, सोपान वाघ यांचा सत्कार करून दिंडी सोहळयास शुभेच्छा देण्यात आल्या.पुंडलिक वरदे ….हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर करत दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले.प्रस्थान प्रसंगी सुवासींनीनी पंचारती ओवाळून पालखी दिंडीचे स्वागत केले.स्वागतासाठी रस्त्यावर सडा रांगोळया काढल्याने येथील वातावरण मंगलमय बनले होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा