नेवासा- अमोल मांडण
नेवासा- तालुक्यातील बचत गटांना मा. सभापती सुनीताताई गडाख यांच्या हस्ते साडेतिन कोटी रूपयांचे वाटप…
आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई अंतर्गत व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद) तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं.स. नेवासा स्वयंसहायता समुहांना भव्य बँक लोन मेळावा नेवासा पंचायत समिती मा.सभापती व बचत गट प्रणेत्या सौ. सुनिताताई गडाख, जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, नेवासा पंचायत समिती गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी सत्यवान खाटीक यांच्या शुभहस्ते नेवासा तालुक्यातील १७४ महिला स्वयंसहायता बचत गटांना आज दि.२६/०९/२०२३/ रोजी पावन गणपती जवळील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, जिल्हा सहकारी बँक, युको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एच.डी.एफ.सी.बँक या बँकांच्या सहकार्याने रुपये ३.५८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नेवासा नगराध्यक्षा योगिता पिंपळे, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, बाळासाहेब सोनवणे, अरुणराव शिंदे, राजूभाऊ सानप, वाखुरे ताई राजूभाऊ सानप, अरुणराव शिंदे, कैलास झगरे, गणेश भोर, निवृत्ती थोपटे तसेच विविध बँकेचे पदाधिकारी व टीम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील बचतगट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा