ब्रेकिंग

नेवासा तालुक्यातील बहिरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न 

नेवासा प्रतिनिधी-सुधीर चव्हाण

नेवासा- तालुक्यातील बहिरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
सोसायटीच्या उत्कर्षासाठी शंभर टक्के वसुली करण्याच निर्धार…

नेवासा तालुक्यातील बहिरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री कालभैरवनाथ देवस्थान सभामंडप बहिरवाडी येथे संस्थेचे मार्गदर्शक अशोक नांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन संजय हेलवडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोसायटीच्या उत्कर्षासाठी शंभर टक्के वसुली करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी झालेल्या बैठक प्रसंगी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस वाचुन कायम करण्यात आली,मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडींग वाचुन कायम करण्यात आले.
सन २०२२-२०२३ सालाची वार्षिक हिशोबी पत्रके (बेरीज, ताळेबंद,नफातोटा,व्यापारी पत्रके) वाचुन मंजुर करण्यात आली.सन२०२३-२०२४ सालासाठी संस्थेने तयार केलेले अंदाज पत्रकास मान्यता देण्यात आली.सन२०२३-२०२४ सालासाठी बँकेकडुन कर्ज मागणीचे अधिकार कार्यकारी मंडळास देण्यात आले, डेडस्टॉक झीजेस मंजूरी देण्यात आली.
थकबाकीदार सभासदांचे थकबाकी वसुली बाबत विचार विनिमय करण्यात येऊन सन २०२१-२०२२ चा ऑडीट दोष दुरुस्ती अहवाल व सन २०२२-२०२३ चा ऑडीट मेमो वाचुन नमुद करण्यात आला तसेच सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षणासाठी लेखापरिक्षकाची नेमणूक करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला व संस्थेचे नोकर सेवकांना बोनस व मेहनताना देणे बाबतचा ही विचार बैठकीत झाला.पंचकमेटी व त्यांचे एकत्रीत कुटुंबातील कर्जाची यादी प्रसिध्द करणे.११४) कलम २४ प्रमाणे संस्थेचे संचालक व सभासद यांना सहकार प्रशिक्षण देणे ),आदर्श उपविधी दुरुस्ती स्वीकारणे तसेच संस्थेच्या क्रियाशिल व अक्रियाशिल सभासदांची माहिती यावेळी देण्यात आली.
सभेच्या गैरहजेरीबाबत अर्ज दिलेल्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापीत करण्यात आली संस्थेचा उत्कर्ष होऊन संस्था उर्जितावस्थाकडे नेण्यासाठी शंभर टक्के कर्ज वसुली करून बँकेपुढे पत निर्माण कशी होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याच्या सूचना संस्थेचे सभासद आसाराम नळघे, संचालक अशोक नांगरे, किशोर पटारे, कडूबाळ टेकाळे, भाऊसाहेब येवले यांनी मनोगत व्यक्त करतांना यावेळी दिल्या.
बहिरवाडी सोसायटीचे अध्यक्ष संजय हेलवडे यांनी मनोगत व्यक्त करतांना संस्थेच्या उत्कर्षासाठी पुढे या असे आवाहन अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना व्यक्त केले.यावेळी सरपंच आनंद नांगरे,बहिरवाडी देवस्थानचे अध्यक्ष अशोक कोलते, सोसायटीचे उपाध्यक्ष सौ.शकुंतला दीपक चापे, मुख्य सचिव एन.एम.कनगरे, सोसायटीचे संचालक अशोकराव नांगरे, कडुबाळ टेकाळे, अशोक चव्हाण, भारती किशोर पटारे, रविंद्र काळे, अर्जुन दुर्योधन भोंगळ, नारायण कडू, सौ.कमल विजय चापे, डॉ.संतोष शेळके, नवनाथ पटारे, भिमराज दाणे, बँक निरीक्षक व्ही.एन.पवार, आसाराम कुताळ, केशव चव्हाण, क्लार्क माळी
यांच्यासह सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.ऊपस्थित सभासदांना सोसायटीचे चेअरमन संजय हेलवडे व व्हाईस चेअरमन दीपक चापे यांच्या वतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे