ब्रेकिंग

नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील इंजिनियर असलेल्या युवकाचा पुणे येथील खडकवासला धरणात बुडून मृत्यू…

नेवासा प्रतिनिधी-सुधीर चव्हाण

नेवासा- तालुक्यातील बहिरवाडी येथील इंजिनियर असलेल्या युवकाचा पुणे येथील खडकवासला धरणात बुडून मृत्यू…

नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील शेतकरी सुपुत्राचा पुणे येथील खडकवासला धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या वृत्ताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.राहुल भाऊसाहेब येवले (वय २३) असे या मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहुल येवले हा सॉप्टवेअर इंजिनियर असलेला युवक पुणे येथील नामांकित कंपनीत नोकरीस होता. रविवारी सुट्टी असल्याने आपल्या मित्र परिवाराबरोबर तो खडकवासला येथील धरण परिसरात गेला होता.मात्र त्यास पोहता येत नसल्याने तो बाजूलाच बसून होता. नंतर कमी पाण्यात उतरला तेथे त्याचा पाय घसरून तोल गेल्याने तो वाहून गेला इतर मित्रांनी आरडाओरड केला. मात्र तो वहात गेला.या घटनेची खबर राहुल याच्या मित्रांनी पोलीसांना कळवली. रविवारी दुपारच्या सुमारास सदरची घटना घडली.या घटनेची खबर राहुल यांच्या घरच्याना कळविण्यात आली. रात्रभर पोलीसांचे शोध पथक राहुल ला शोधण्यासाठी कार्यरत होते.अखेर सोमवारी सायंकाळच्या सुमारास राहुलचा मृतदेह पोलिसांना मिळून आला.राहुल येवले हा देवगड भक्त परिवारातील सदस्य असलेले भाऊसाहेब येवले सर यांचा चिरंजीव होता.राहुल निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे अनेकांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत दुःख व्यक्त केले. मंगळवारी दि.१३ रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात राहुल याच्यावर बहिरवाडी शिवारात असलेल्या निवासस्थानाजवळील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.राहुल येवले यांच्या पच्यात आई,वडील,एक भाऊ,एक बहीण,मेव्हणे असा परिवार आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे