नेवासा- अमोल मांडण
नेवासा- नेवासा खरेदी-विक्री संघावर श्री.राजेंद्र पोतदार यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी नेवासा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ या संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.राजेंद्र पोतदार यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मागील पन्नास वर्षाचा इतिहास बघितला तर प्रत्येक निवडणुक बिनविरोध झाल्याचा दाखला आहे. आमदार शंकरराव गडाख आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे कट्टर समर्थक असलेले श्री.राजेंद्र पोतदार हे संयमी व युवा नेते म्हणून अहमदनगर जिल्ह्यात परिचित आहे.नेवासा तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पोतदार यांचे विशेष सहकार्य सहमतीचे धोरण सुद्धा कारणीभूत ठरले आहे. त्यांच्या निवडीने नेवासा खरेदी-विक्री संघाला एक नवीन युवक नेतृत्व मिळाले आहे. आपण नेहमी सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहणार असून सर्व सभासदांचे, हितचिंतकाचे, मित्र परिवारांचे आभार मानतो,असे श्री.राजेंद्र पोतदार यांनी सांगितले. पोतदार यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा