नेवासा- अमोल मांडण
नेवासा- तालुक्यातील मक्तापूर येथील जि.प.प्रा. शाळेत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला
नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील जिल्हा परिषद शाळेत दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी मराठा सुकाणु समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व शालेय व्यवसाय समितीचे अध्यक्ष गणेश झगरे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुभाष चव्हाण, मक्तापूरचे सरपंच सुशीलाताई लहारे, पोलीस पाटील अनिल लहारे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, ग्रामपंचायत सदस्या अलका साळवे, नेवासा बाजार समितीचे निवडून आलेले उमेदवार भरत काळे, अनिल गोरे, राहुल साळवे, सचिन गायकवाड, अनिल हिवाळे, समा हिवाळे, रमेश साळवे, राहुल जामदार, दत्तात्रेय कोळेकर सर इनामदार शकूर, कचरे सर, गंधारे सर, ज्ञानेश्वर कराडे, योगेश गायकवाड, अशोक साळवे, तन्मय पांडागळे, सुनील साळवे, जगदाळे मॅडम, सोनवणे मॅडम, गोरक्षनाथ नवघरे सर ग्रामस्थ व शिक्षक वृंद उपस्थित होते.
नेवासा बाजार समितीचे निवडून आलेले उमेदवार भरत काळे यांचा मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने व शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा