नेवासा प्रतिनिधी- सुधीर चव्हाण
नेवासा-भारतीय जनता पार्टीच्या उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्षपदी अशोकराव कोळेकर यांची निवड करण्यात आली.
बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी भाजपच्या मागे ताकद उभी करू
-अशोकराव कोळेकर
भारतीय जनता पार्टीच्या उत्तर नगरजिल्हा उपाध्यक्षपदी धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कोळेकर यांची निवड पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केली आहे.बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी भाजपच्या मागे ताकद उभी करू असा निर्धार अशोकराव कोळेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला
धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी नुकताच नाशिक येथे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केलेला होता.भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी कोळेकर यांना उत्तर नगरजिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
गोंदकर यांनी नियुक्ती पञात म्हटले आहे की,भाजपाचे कार्य आपण जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कटीबद्ध राहून पक्षाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा जपत अधिकाधिक लोकांना आपल्या विचारांशी जोडण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी नियुक्ती पञात केले आहे कोळेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या नगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे अनेकांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा