नेवासा प्रतिनिधी-सुधीर चव्हाण
नेवासा- येथील ईद मिलन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..
नेवासा येथील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणाम च्या सभागृहात ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवोदय विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक अन्सार शेख यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजक नवोदय विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक अन्सार शेख यांनी गजर गुढी ग्रुप व नेवासा मेलडी ग्रुपच्या गायक कलाकारांचे व सदस्यांचे स्वागत केले.माऊलींच्या या भूमीत बंधुभाव वाढीस लागावा एकात्मता नांदावी या भावनेतून सर्व मित्र परिवाराला बरोबर घेऊन हा कार्यक्रम करत असल्याचे यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मेडिकल असोसिएशनचे मार्गदर्शक डॉ.शंकरराव शिंदे,नगराध्यक्ष सतीश पिंपळे,मार्गदर्शक विजय कावरे,हुसेन शेख,बाळासाहेब परदेशी,नेवासा प्रेस क्लबचे संपर्क प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण,पत्रकार मकरंद देशपांडे,प्रणाम हॉटेलचे प्रमुख रंजनदादा जाधव,बंटीभाऊ जाधव,विवेक नळकांडे,प्रशांत कानडे, वास्तू शिल्पकार गायक राजेंद्र परदेशी,अभयकुमार मोहिते,भाजपचे शहर उपाध्यक्ष गायक राजेश कडू, गायक राजूभाई शेख,गायक विशाल पवार,आदित्य कडू उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा